बिलावल भुट्टो होणार पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते 

पीटीआय
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याचे निश्‍चित झाले आहे. याआधी 64 वर्षीय खुर्शीद शहा यांच्याकडे ही जबाबदारी होती. आता ते 28 वर्षीय बिलावल भुट्टो यांचे सल्लागार म्हणून काम पाहतील. 

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याचे निश्‍चित झाले आहे. याआधी 64 वर्षीय खुर्शीद शहा यांच्याकडे ही जबाबदारी होती. आता ते 28 वर्षीय बिलावल भुट्टो यांचे सल्लागार म्हणून काम पाहतील. 

यासंदर्भात 'द एक्‍सप्रेस ट्रिब्युन'ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. ऑक्‍सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलेले बिलावल भुट्टो सध्या ''पाकिस्तान पीपल्स पार्टी'चे (पीपीपी) अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वीच सिंध प्रांतातून निवडणूक लढविण्याचा निर्णय बिलावल यांनी घेतला होता. बिलावल यांना विरोधी पक्षनेता करण्याचा निर्णय खुर्शीद शहा यांनीच जाहीर केला. 

'आता बिलावल भुट्टो विरोधी पक्षनेते होतील. मी त्यांचा सल्लागार म्हणून काम करेन आणि त्यांचे वडील असिफ अली झरदारी बिलावल यांना संसदीय राजकारणाचे धडे देतील,' असे शहा यांनी काल (गुरुवार) पत्रकारांना सांगितले. 'हा निर्णय घाई-गडबडीत घेतलेला नाही. गेले अनेक दिवस यासंदर्भात चर्चा सुरू होती,' असे पक्षातर्फे सांगण्यात आले. 

बेनझीर यांच्याप्रमाणेच बिलावल भुट्टो यांच्यातही नेतृत्वगुण आहेत. पण संसदीय राजकारणाचे डावपेच त्यांना अद्याप माहीत नाहीत. अर्थात, यात चुकीचे काही नाही. 1988 मध्ये बेनझीर यांच्याकडे पंतप्रधानपद सोपविण्यात आले, तेव्हा त्याही पक्षातील इतर नेत्यांपेक्षा वयाने लहानच होत्या. 
- लालबक्ष भुट्टो, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रवक्ते 

ग्लोबल

अमेरिकेने खडसावल्यानंतर "ड्रॅगन'कडून जोरदार पाठराखण बीजिंग: दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...

09.33 PM

वॉशिंग्टन : पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी स्वर्ग बनला आहे. अमेरिका आता यावर गप्प बसू शकत नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष...

10.39 AM

अमेरिकेतील मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालातील नोंद; गेल्या वर्षी सर्वाधिक दहशतवादी हल्ले वॉशिंग्टन: "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017