स्वीस बॅंकांतील पैशांची आपोआप मिळणार माहिती

वृत्तसंस्था
शनिवार, 17 जून 2017

बर्न/नवी दिल्ली - भारतीयांनी स्वीस बॅंकांमध्ये ठेवलेल्या काळ्या पैशाच्या माहितीची स्वित्झर्लंड सरकारकडून भारताशी आपोआप देवाणघेवाण होणार आहे. याबाबतच्या कराराला स्वित्झर्लंड सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली असून, माहितीची आपोआप देवाणघेवाण सुरू होण्याची तारीख लवकरच निश्‍चित होईल.

स्वीस बॅंकांमध्ये भारतीय नागरिकांनी ठेवलेल्या काळ्या पैशाची देवाणघेवाण करण्याचा करार स्वित्झर्लंड सरकारने केला आहे. ही माहितीची देवाणघेवाण भारताकडून कोणतीही मागणी न करता आपोआप होणार असून, ती 2019 पासून सुरू होईल, अशी शक्‍यता आहे. भारतीयांचा मोठ्या प्रमाणात काळा पैसा स्वीस बॅंकांमध्ये आहे. स्वित्झर्लंडने भारतासह अन्य देशांशी आर्थिक माहितीची आपोआप देवाणघेवाण करण्यास आज मंजुरी दिली आहे. स्वित्झर्लंड सरकारने यासाठी टाकलेल्या अटींचे पालन केल्यानंतर आता याला मंजुरी मिळाली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारत आणि स्वित्झर्लंडने काळ्या पैशाच्या माहितीची आपोआप देवाणघेवाण करण्याविषयी करार केला होता. भारत सरकारने सप्टेंबर 2019 पासून स्वित्झर्लंडकडून माहिती मिळण्यास सुरवात होईल, असे सूतोवाच गेल्या वर्षी केले होते.