श्रीलंका क्रिकेट संघावरील हल्ल्याचा सूत्रधार ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

पेशावर- श्रीलंका क्रिकेट संघावर मार्च 2009 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार चकमकीत अफगणिस्तानमध्ये ठार झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी आज (सोमवार) दिली.

पेशावर- श्रीलंका क्रिकेट संघावर मार्च 2009 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार चकमकीत अफगणिस्तानमध्ये ठार झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी आज (सोमवार) दिली.

तालिबान या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘अफगाण सुरक्षा दलाचे जवान व नाटोच्या जवानांनी एकत्रित मिळून केलेल्या कारवाईत लष्कर-ई-झांग्वी या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचा नेता व श्रीलंक क्रिकेट संघावरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अक्री अजमल हा अफगणिस्तानमध्ये ठार झाला आहे. अफगणिस्तानमधील पकतिका प्रांतात सैनिकांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली. या कारवाईमध्ये अजमल याच्यासह अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.‘

दरम्यान, लाहोर येथे श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर मार्च 2009मध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा पोलिस ठार तर दोन नागरिक व सात क्रिकेटपटू जखमी झाले होते.