पुरुषाने दिला मुलीला जन्म 

पीटीआय
सोमवार, 10 जुलै 2017

ब्रिटनमधील पहिलीच घटना 
लंडन : ब्रिटनमधील 21 वर्षांच्या एका गरोदर पुरुषाने मुलीला जन्म दिला आहे. वीर्यदात्याच्या (स्पर्म डोनर) माध्यमातून तो गरोदर राहिला होता. पुरुषाने गर्भधारणा करून अपत्याला जन्म देण्याची ब्रिटनमधील ही पहिलीच घटना आहे. 

हेडन क्रॉस असे या पुरुषाचे नाव आहे. हेडन हा तीन वर्षांपूर्वी स्त्री होता. मात्र, त्याने संप्रेरकबदल शस्त्रक्रियेद्वारे (हार्मोन चेंज) स्वत:चे पुरुषात रूपांतर करून घेतले. मात्र, ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने पूर्वीच्या या स्त्रीचे अंडाशय गोठविण्यास नकार दिल्याने ही प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. यामुळे क्रॉस याने फेसबुकच्या माध्यमातून स्पर्म डोनर शोधला आणि तो गरोदर राहिला. जून 16 ला त्याने मुलीला जन्म दिला असून, तिचे नाव ट्रिनिटी असे ठेवण्यात आले आहे. अमेरिकेमध्ये 2008 मध्ये थॉमस बिटी या अपत्याला जन्म देणारा जगातील पहिला पुरुष ठरला होता. यानेही लिंगबदल करताना आपले गर्भाशय कायम ठेवले होते. 
 
टॅग्स