'स्टार वॉर्स' फेम अभिनेत्री कॅरी फिशर यांचे निधन

वृत्तसंस्था
बुधवार, 28 डिसेंबर 2016

लॉस एंजल्स - 1977मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्टार वॉर्स' या चित्रपटातील 'प्रिन्सेस लेया' म्हणून आपली छाप निर्माण करणाऱ्या अभिनेत्री कॅरी फिशर (60) यांचे काल (मंगळवार) निधन झाले. 

त्यांच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, कॅरी फिशर यांना शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.  

फिशर यांच्या जाण्याने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. विविध कलाकार फिशर यांना श्रद्धांजली देत आहेत. 

1975मध्ये अभिनेता वॉरन बिटीसोबत 'शॅम्पू'  चित्रपटातून फिशर यांनी हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याचबरोबर 'ऑस्टिन पॉवर्स', 'द ब्लूज ब्रदर्स', 'चार्लिज एन्जल्स', 'हॅना ऍण्ड हर सिस्टर्स', 'स्क्रिम ३' आणि 'व्हेन हॅरी मेट सॅली' या आणि यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

'स्टार वॉर्स' या चित्रपटाने कॅरी फिशर यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. त्यांची ही भूमिका आणि 'हेल्प मी ओबी वन, यु आर माय ओन्ली होप' हा संवाद आजही चित्रपट रसिकांच्या स्मरणात आहे.