प्रदूषणमुक्तीकडे चीनची आश्‍वासक पावले

प्रदूषणमुक्तीकडे चीनची आश्‍वासक पावले

शांघाय (चीन) : कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट चीनने तीन वर्षे आधीच पूर्ण केल्याचे वृत्त 'झिनुआ' या अधिकृत वृत्तसंस्थेने नुकतेच दिले आहे. चीनमधील हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

ऊर्जेचा जगातील सर्वांत मोठा ग्राहक असलेल्या चीनमधील कार्बन उत्सर्जनाची पातळी 2005मध्ये मोठ्या प्रमाणात घटली आहे. तापमानवाढीमुळे आर्थिक विकासाच्या एका युनिटने निर्माण होणाऱ्या कार्बन डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण 2017 मध्ये 46 टक्‍क्‍यांनी कमी करण्यास चीनला यश आले आहे. 2017 मध्ये कार्बनच्या पातळीत गेल्या वर्षापेक्षा 5.1 टक्‍क्‍यांनी घट झाली, असे 'झिनुआ'ने म्हटले आहे. प्रदूषणाविरोधात चीनने सुरू केलेल्या मोहिमेमुळे हरितगृहातील वायूचे उत्सर्जन कमी करणे शक्‍य झाले आहे. 

आता देशभरात उत्सर्जन क्षमता व व्यापार व्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान चीनसमोर आहे. ही योजना 2017मध्ये अमलात आली असली तरी उत्सर्जनाबद्दल खात्रीशीर माहिती नसणे या व अशा तांत्रिक त्रुटींमुळे ती प्रलंबित आहे. चीनमधील 'नॅशनल डेव्हलपमेंट अँड रिफॉर्म कमिशन'चे (एनडीआर) माजी उपाध्यक्ष आणि सध्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य प्रतिनिधी झिऊ यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन अब्ज टनांपेक्षा जास्त क्षमता असलेले कार्बन उत्सर्जनमुक्त एक हजार 700 ऊर्जा प्रकल्प सध्या देशात सुरू आहे. हे प्रमाण जगात सर्वांत जास्त आहे. अन्य उद्योगही कार्बन उत्सर्जनमुक्त करण्याचे चीनचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी सांगितले. 

2017मधील स्थिती 
कार्बन उत्सर्जनातील घट 
46 टक्के 

कार्बन उत्सर्जन 
5.1 टक्के 


चीनची आश्‍वासनपूर्ती 
पॅरिस येथे 2015 मध्ये झालेल्या नवीन जागतिक हवामान करारानुसार आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेल्या आश्‍वासनानुसार कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 2005 पर्यंत 40 ते 45 टक्के घट करण्याचे आव्हान चीनसमोर होते. त्यातील पहिला टप्पा 2009 मध्ये पूर्ण झाला, तर 2017 मध्ये चीनने आश्‍वासनपूर्ती केली.

आधी उन्हाचा चटका, त्यात हवाही बेकार!

दोन रुपये वाचवताना तुम्ही जीवच धोक्यात घालताय!
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com