'ड्रॅगन'कडून पुन्हा पाकची पाठराखण

पीटीआय
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

बीजिंग - गोव्यात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ब्रिक्‍स परिषदेचा पाकिस्तानच्या विरोधात भारताने खुबीने वापर करून घेतला असल्याचा आरोप चिनी माध्यमांनी आज केला. विभागातील इतर देशांनी पाकिस्तानला एकटे पाडले आहे, असे चित्र निर्माण करण्याचा ब्रिक्‍स परिषदेच्या माध्यमातून भारताचा प्रयत्न होता, असे चीनच्या सरकारी माध्यमाने दिले आहे.

गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या ब्रिक्‍स परिषदेसाठी भारताने विभागातील पाकिस्तानवगळता इतर सर्व देशांना आमंत्रण दिले होते. त्यावरून पाकिस्तानला विभागातील सर्वच देशांनी एकटे पाडले असल्याचा संदेश भारताला द्यायचा होता. त्यासाठी भारताने सर्व प्रकारच्या डावपेचांचा वापर केला. उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादेतील सार्क परिषदेवर भारताने बहिष्कार टाकला होता. इतरही देशांनी या परिषदेवर बहिष्कार टाकल्याने ही परिषदच बारगळी होती. पाकिस्तानशी असलेले मतभेद दूर करण्यासाठी ब्रिक्‍स परिषदेच्या माध्यमातून भारताला संधी चालून आली होती. मात्र, भारताने ती हातची घालवली. कारण, सार्क परिषदेला उपस्थित राहणार असलेले सर्व सदस्य देश ब्रिक्‍स परिषदेवेळी उपस्थित होते, अशा शब्दांत चीनच्या सरकारी माध्यमाने भारताच्या भूमिकेवर खरमरीत टीका केली आहे.

गोव्यातील ब्रिक्‍स परिषदे वेळी ब्रिक्‍सच्या सदस्य देशांना भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही एका देशाची बाजू घेण्याचे टाळले असले तरी परिषदेचे आयोजक म्हणून मिळालेल्या संधीचा उपयोग भारताने पाकिस्तानच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यासाठी केला, असे चीनने म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अलीकडच्या काळात ताणलेले असले तरी "बिमस्टेक'मध्ये भारताचा समावेश करण्यात आला होता, याची आठवणही चीनने करून दिली आहे.
एकूणच पाकिस्तानच्या विरोधातील भारताचे डावपेच चीनच्या पचनी पडलेले नाहीत असे दिसते. त्यामुळे भारताने ब्रिक्‍स परिषदेचा वापर पाकिस्तानच्या विरोधात करून घेतला असा दावा करत आपण पाकिस्तानची बाजू घेत असल्याचे चीनने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.