सेलिब्रिटिंचा वेळ मिळणार विकत

A celebrity time app
A celebrity time app

बीजिंग - आपल्याला आवडणाऱ्या सेलिब्रिटी बरोबर एखादा फोटो काढण्यासाठी, किंवा त्यांच्याशी नुसते बोलण्यासाठी, इतकंच काय तर त्यांना नुसते बघण्यासाठी देखील चाहते प्रयत्न करत असतात. पण, आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचा वेळ जर तुम्हाला विकत मिळाला तर..? एका चीनी ऍपवर ही सुविधा आता उपलब्ध होणार आहे. 

बीजिंगमधील एका ऍपवर चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचा वेळ विकत घेता येणार आहे. असे असले तरी यासाठी त्यांना सेलिब्रिटींच्या प्रत्येक सेकंदाची किंमत मोजावी लागणार आहे. यामध्ये व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल किंवा प्रत्यक्ष भेटण्साठीचा वेळ यानुसार किंमत द्यावी लागणार आहे. तसेच व्हॉईस कॉलचा वेळ विकत घेण्यासाठी किमान 600 सेकंदांचा वेळ विकत घेणे बंधनकारक असणार आहे. तर, प्रत्यक्ष भेटण्यासाठी किमान 7,200 सेकंद विकत घ्यावे लागणार आहेत. याशिवाय चाहत्यांना या सेंकंदांचे स्टॉक मार्केट सारखे ट्रेडिंगही करता येणार आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे पहिले 'टाईम ट्रेडिंग ऍप' आहे. तसेच चाहत्यांना मध्यस्थी म्हणून देखील या ऍपसाठी कामही करता येणार आहे. मोठ्या प्रमाणावर सेलेब्रिंचा वेळ मोठ्या विकत घेऊन त्याची सेकंदाप्रमाणे विक्री याद्वारे चाहत्यांना करता येणार आहे.

हे ऍप सरकारमान्य असले तरी याच्या कायदेशीर बाजूंबद्दल साशंकता आहे. सीन ल्यू या कायदेज्ञांनी एका वृत्तपत्राशी बोलताना वेळेचे ट्रेडींग केल्याने स्टॉक मार्केटच्या नियमांचे उल्लंघन होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com