दाऊदच्या पाकिस्तानमधील 3 मालमत्तांची जप्ती

वृत्तसंस्था
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

ब्रिटनच्या अर्थमंत्रालयाने नुकतेच याबाबत अध्यादेश जारी केले आहेत. ब्रिटनने तयार केलेल्या यादीनुसार "कासकर दाऊद इब्राहीम'चे पाकिस्तानातील तीन पत्ते- घर नं. 37, गल्ली नंबर 30, डिफेंस हाउसिंग ऑथोरिटी, कराची आणि कराचीतील नूराबाद येथील मालमत्ता तसेच व्हाईट हाउस, सऊदी मस्जिदीजवळ, क्‍लिफटर, कराची या मालमत्तांचा समावेश आहे.

लंडन : भारताचा मोस्ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहीमच्या मालमत्तांना ब्रिटिश सरकारने आर्थिक निर्बंधांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. यामुळे लवकरच दाऊदच्या मालमत्तांची जप्ती होण्याची शक्‍यता आहे. ब्रिटनच्या यादीत दाऊदच्या पाकिस्तानमधील 3 मालमत्तांचा तसेच त्याच्या 21 उपनावांचाही उल्लेख करण्यात आला आहे. 

ब्रिटनच्या अर्थमंत्रालयाने नुकतेच याबाबत अध्यादेश जारी केले आहेत. ब्रिटनने तयार केलेल्या यादीनुसार "कासकर दाऊद इब्राहीम'चे पाकिस्तानातील तीन पत्ते- घर नं. 37, गल्ली नंबर 30, डिफेंस हाउसिंग ऑथोरिटी, कराची आणि कराचीतील नूराबाद येथील मालमत्ता तसेच व्हाईट हाउस, सऊदी मस्जिदीजवळ, क्‍लिफटर, कराची या मालमत्तांचा समावेश आहे. याचसोबत मागील वर्षांपर्यंत ब्रिटनच्या यादीत समाविष्ट असणारे, हाउस नं. 29, मारगल्ला रोड, एफ 6/2 स्ट्रीट नं. 22, कराची या पत्त्यावरील मालमत्तेचा सध्याच्या यादीत समावेश केलेला नाही. मात्र, दाऊदसंबंधित मालमत्तांची ब्रिटन सरकार चौकशी करत आहे. 

ब्रिटनकडील दाऊदची 21 उपनावे 
ब्रिटिश सरकारकडे असलेल्या नोंदणी रजिस्टरमधे दाऊद इब्राहीमच्या 21 उपनावांचा समावेश आहे. यामध्ये अब्दुल, शेख, इस्माइल, अब्दुल अजीज, अब्दुल हमीद, अब्दुल रहमान, शेख, मोहम्मद, अनीस, इब्राहिम, शेख, मोहम्मद भाई, बड़ा भाई, दाऊद भाई, इकबाल, दिलीप, अजीज, इब्राहिम, दाऊद, फारुकी, शेख, हसन, कासकर, दाऊद हसन, शेख कासकर, दाऊद, हसन, शेख, इब्राहिम, कासकर, इब्राहिम, मेमन, कासकर, दाऊद, हसन, इब्राहिम, मेमन, दाऊद, साहब, हाजी, सेठ आणि बडा या नावांचा समावेश आहे.