Nuclear Attack: आण्विक शस्त्रे कधी वापरणार? रशियाने केला खुलासा

Dmitry Peskov Clarify When Russia May use Nuclear Weapon
Dmitry Peskov Clarify When Russia May use Nuclear Weapon esakal

रशिया आणि युक्रेन यांच्यातील लष्करी संघर्ष (Russia Ukraine War) काही केल्या थांबत नाही आहे. युद्धात रशियाने युक्रेनवर आधी व्हॅक्यूम बॉम्ब त्यानंतर क्रूझ मिसाईलचा हल्ला केला. यानंतर रशिया युक्रेनमध्ये आण्विक शस्त्रांचा (Nuclear Weapon) देखील वापर करू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता रशिया कधी आण्विक शस्त्रांचा वापर करणार याबाबतचा खुलासा क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह (Dmitry Peskov) यांनी सीएनएन या वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

Dmitry Peskov Clarify When Russia May use Nuclear Weapon
श्रीलंकेत महागाईने गाठला कळस! 790 रुपयांत 400 ग्रॅम दूध पावडर

दिमित्री म्हणाले की, 'आमच्या देशांतर्गत सुरक्षेबाबत काही संकल्पना आहेत. या सर्व संकल्पना सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. तुम्ही त्या सर्व वाचू शतका. आम्ही कोणत्या परिस्थिती आण्विक शस्त्रांचा वापर करणार याबाबत सर्व माहिती दिली आहे. त्यात ज्यावेळी रशियाच्या अस्तित्वाला धोका (Existential Threat) निर्माण होईल त्यावेळी रशिया आण्विक शस्त्रांचा वापर करेल.'

Dmitry Peskov Clarify When Russia May use Nuclear Weapon
Russia Ukraine: सुरक्षेची हमी द्या, तडजोड करतो; युक्रेनचे आवाहन

ज्यावेळी रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी 28 फेब्रुवारीला देशाच्या आण्विक रणनितीविषक तुकड्यांना हाय अलर्टवर ठेवले होते. त्यामुळे रशिया युक्रेन युद्धात आण्विक शस्त्रांचा वापर तर करणार नाही ना अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली. पेंटेगॉनचे प्रवक्ते जॉन किरबे यांनी देखील चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की 'एखादा जबाबदार आण्विक शस्त्रे असणारा देश असा वागत नाही.'

रशियाकडे जगातील सर्वात जास्त आण्विक शस्त्रे आहेत. मात्र रशियाला युक्रेनवरील हल्ल्यानंतर फार कमी देशांचा पाठिंबा मिळाला होता. याचबोबर वेस्टर्न डिफेन्स अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुतीन यांनी घोषणा केल्यापासून त्यांना रशियाच्या आण्विक तुकडीची, त्यांच्या आण्विक बॉम्बर विमाने, मिसाईल आणि आण्विक पाणबुड्यांची मोठी हालचाल दिसलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com