'अमेरिकेच्या संस्कृतीत हिंदू समुदायाचा मोठा वाटा'

वृत्तसंस्था
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

वॉशिंग्टन - जागतिक आणि अमेरिकेच्या संस्कृतीत हिंदू समुदायाचा विलक्षण वाटा असल्याचे, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टन - जागतिक आणि अमेरिकेच्या संस्कृतीत हिंदू समुदायाचा विलक्षण वाटा असल्याचे, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

पुढील महिन्यात न्यू जर्सी येथे होणाऱ्या भारत-अमेरिका संयुक्त कार्यक्रमाला ट्रम्प हजेरी लावणार आहेत. हा कार्यक्रम 15 ऑक्टोबरला होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हिंदू समुदायाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. तसेच त्यांनी अमेरिकेला आणखी प्रगत होण्यासाठी या कार्यक्रमाचा फायदाच होणार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या कार्यक्रमा बॉलिवूडमधील काही नेते आणि गायक सहभागी होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प म्हणा, की या कार्यक्रमाचा मुस्लिम दहशतवादाविरोधात जागतिक स्तरावर लढण्यासाठी फायदा होणार आहे. हिंदू समुदायाचे अमेरिकेच्या संस्कृतीतील योगदान हे मोलाचे आहे. निस्वार्थ सेवा, कठोर मेहनत, कुटुंबमूल्ये आणि मजबूत परराष्ट्र धोरण यासाठी हिंदू संस्कृतीचा खूप फायदा झाला आहे.