फेसबुकचा चीनमध्ये शिरकाव

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

स्थानिक कंपनीशी भागीदारीतून ऍप आणले असले, तरी इंटरनेट नियामक संस्थांना याबद्दल माहिती असल्याबद्दल अद्याप स्पष्ट झालेले नाही. चीनमध्ये फेसबुक आणि ट्‌विटर यांच्यावर बंदी आहे. या बंदीमुळे स्थानिक "वुईचॅट' आणि "वेबो' यांना मोठ्या प्रमाणात यूजर्स मिळत असून, त्यांची लोकप्रियताही प्रचंड आहे.

न्यूयॉर्क : फेसबुक या सोशल नेटविर्कंग साइटवर चीनमध्ये बंदी असली, तरी चीनमधील एका स्थानिक कंपनीने फेसबुकशी साधर्म्य असलेले फोटो शेअरिंग ऍप्लिकेशन सुरू केले आहे. या स्थानिक कंपनीत फेसबुकची भागीदारी आहे. 

"कलरफूल बलून्स' असे या ऍपचे नाव आहे. फेसबुकच्या "मोमेंट' ऍपसारखचे ते आहे; मात्र "कलरफूल बलून्स'वर फेसबुकचे नाव अथवा लोगो नाही. चीनमधील योजू इंटरनेट टेक्‍नॉलॉजी या कंपनीने हे नवे ऍप आणले आहे. या कंपनीत फेसबुकची भागीदारी आहे. चीनमधील व्यवसाय आणि विकसकांना मदत करण्याच्या हेतून फेसबुक स्थानिक कंपन्याशी भागीदारी करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामुळे चीनमध्ये जाहिरातींचा व्यवसाय वाढविण्यास फेसबुकला मदत होत आहे. 

स्थानिक कंपनीशी भागीदारीतून ऍप आणले असले, तरी इंटरनेट नियामक संस्थांना याबद्दल माहिती असल्याबद्दल अद्याप स्पष्ट झालेले नाही. चीनमध्ये फेसबुक आणि ट्‌विटर यांच्यावर बंदी आहे. या बंदीमुळे स्थानिक "वुईचॅट' आणि "वेबो' यांना मोठ्या प्रमाणात यूजर्स मिळत असून, त्यांची लोकप्रियताही प्रचंड आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी फेब्रुवारी महिन्यात बोलताना चीनमध्ये विस्तार करण्याची शक्‍यता फेटाळून लावली होती.