वॉशिंग्टनमध्ये मॉलमध्ये गोळीबार; चौघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 24 सप्टेंबर 2016

बर्लिंग्टन - अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील बर्लिंग्टन शहरातील एका मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून, बर्लिंग्टन शहरातील कॅसकेड मॉलमध्ये लपलेल्या बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून बंदुकधारी व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मॉलमध्ये रेस्टॉरंट आणि चित्रपटगृहे असल्याने मोठी गर्दी असते. हल्लेखोर लॅटीन अमेरिकेतील असल्याची शक्यता आहे.

प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले की, करड्या रंगाचे कपडे घालून आलेल्या बंदुकधारी व्यक्तीने मॉलमध्ये प्रवेश करताच गोळीबार सुरु केला. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

टॅग्स