ट्रम्प यांना वेळ द्या : ओबामा  

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

वॉशिंग्टन - "डोनाल्ड ट्रम्प यांना नागरिकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांना वेळ द्या. त्यांच्याबद्दल आताच पूर्वग्रहदूषित मते व्यक्त करू नका,' असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज केले आहे. ट्रम्प यांच्या निवडीचा धक्का बसलेल्या युरोपमधील देशांनाही ओबामा यांनी दोन दिवसांपूर्वी हेच आवाहन केले होते. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान आक्रमक धोरणे जाहीर केली होती. त्यामुळे अमेरिकी नागरिकांबरोबरच अनेक देशांनीही चिंता व्यक्त केली होती. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचाच विजय झाल्याने या सर्व जणांना धक्का बसला आहे. युरोपमधील राष्ट्रप्रमुखांनी नुकतीच ओबामा यांची भेट घेऊन याबाबत काळजी व्यक्त करून करारांबाबत आश्‍वासन घेतले होते. त्यांना दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणचे ओबामा यांनी आज लॅटिन अमेरिकेतील त्यांच्या दौऱ्यावेळीही हेच सांगितले. 

ओबामा म्हणाले, "ट्रम्प यांना वेळ देणे आवश्‍यक आहे. खूप काही वाईट होणार नाही, याची आशा करा. नवे प्रशासन त्यांची धोरणे अद्यापही आखत आहे. ही धोरणे जाहीर झाल्यावर मत व्यक्त करा.'' 

ग्लोबल

ऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊल सॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून,...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

जेद्दाह - सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या जेद्दाह येथील रस्त्यावर एका लोकप्रिय...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

लंडन : भारताचा मोस्ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहीमच्या मालमत्तांना ब्रिटिश सरकारने आर्थिक निर्बंधांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे....

बुधवार, 23 ऑगस्ट 2017