नरेंद्र मोदी - नझरबयेव यांच्या द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जून 2017

अस्थाना : भारत आणि कझाकस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कझाकचे अध्यक्ष नूर सुलतान नझरबयेव यांच्यात आज येथे चर्चा झाली.

येथे दोन दिवस होत असलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आज येथे आगमन झाले आहे. या परिषदेमध्ये पाकिस्तानही सहभागी झाला आहे. या वेळी त्यांनी कझाकचे अध्यक्ष नझरबयेव यांची भेट घेतली.

कझाकिस्तानचे अध्यक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्‌विटरच्या माध्यमातून दिली आहे.

शांधाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आर्थिक, कनेक्‍टिव्हिटी आणि दहशतवादाशी लढ्यासाठी भारताशी सहकार्य करेल, अशी आपल्याला आशा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांचे उद्या (शुक्रवारी) या परिषदेत भाषण होणार आहे. त्याचप्रमाणे चीनबरोबरील वाढत्या मतभेदाच्या पार्श्‍वभूमीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचीही मोदी भेट घेण्याची शक्‍यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि मोदी यांच्यात भेट होण्याची शक्‍यता आहे.