दौऱ्याने भारत-ब्रिटन संबंधांचे महत्त्व अधोरेखित- थेरेसा

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

लंडन : ब्रिटन - भारत द्विपक्षीय संबंधांतील महत्त्व अधोरेखित करणारा आगामी तीनदिवसीय भारत दौरा आहे, असे मत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी व्यक्त केले. थेरेसा मे 6 नोव्हेंबरपासून भारत भेटीवर येत आहेत.

येथील भारतीय समुदायाला थेरेसा मे यांनी अधिकृत निवासस्थानी पहिल्यांदा दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी निमंत्रित केले होते. या वेळी बोलताना मे म्हणाल्या, ""गेल्या वर्षी मोदी यांनी येथे डाऊनिंग स्ट्रीटवर त्यांच्या दौऱ्याची सुरवात केली होती. पुढील महिन्यात मी भारत भेटीवर जात आहे. युरोपीय समुदायाबाहेरील ही माझी पहिली द्विपक्षीय भेट असेल. मी दिल्ली आणि बंगळूर येथे जाणार असून, या भेटीमुळे भारत-ब्रिटन संबंधांतील महत्त्व अधोरेखित होते. भविष्यातील महत्त्वाकांक्षा आणि दोन्ही देशांतील संबंध साजरे करण्याची ही वेळ आहे.''

या कार्यक्रमाची सुरवात मे, येथील भारतीय उच्चायुक्त दिनेश पाठक आणि बीएपीएस स्वामीनारायण मंदिराचे विश्‍वस्त जित पटेल यांनी दीप प्रज्वलनाने केली. मे यांच्यासोबत ब्रिटनमधील व्यापारी शिष्टमंडळ भारत भेटीवर येणार आहे. युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ब्रिटन युरोपीय समुदायाबाहेरील द्विपक्षीय संबंधांवर भर देत आहे.