भारतीय अधिकारी निराशावादी- चीनची टीका

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

'अझर मसूद' आणि 'अणू पुरवठादार गटाचे सदस्यत्व' याबाबतचा वाद सुटला नसल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी वारंवार सांगितले. 

बीजिंग : भारत आणि चीन यांच्यादरम्यान द्विपक्षीय चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. मात्र, असे असतानाही भारतीय अधिकारी निराशावादी असल्यासारखे वागत आहेत, अशी टीका चीनमधील 'ग्लोबल टाइम्स' या सरकारी वृत्तपत्राने केली आहे. 

भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे मागील आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर गेले होते. चीन दौऱ्यावर असताना जयशंकर यांच्यासोबत विविध मुद्‌द्‌यांवर चीनी समपदस्थ पदाधिकाऱ्यांची यशस्वीपणे चर्चा झाली आणि संबंधित क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी सहकार्य वाढवावे असेही ठरविण्यात आले.

दरम्यान, ही सकारात्मक बाजू सोडून सर्व भारतीय अधिकाऱ्यांनी 'अझर मसूद' आणि 'अणू पुरवठादार गटाचे सदस्यत्व' याबाबतचा वाद सुटला नसल्याचे वारंवार सांगत इतर चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे.
 

ग्लोबल

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

09.33 PM

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

10.57 AM

बार्सिलोना - स्पेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बार्सिलोना येथे गर्दीमध्ये...

10.33 AM