मोसूलमध्ये इसिसकडून निर्घृण हत्याकांड

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

जिनेव्हा - इराकमधील अत्यंत महत्वपूर्ण शहर असलेल्या मोसूलजवळ इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने 50 माजी पोलिस अधिकाऱ्यांची हत्या केल्याची भीती संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे. या अधिकाऱ्यांना इसिसकडून ओलिस म्हणून ठेवण्यात आले होते. या पोलिस अधिकाऱ्यांसहित इसिसने अनेक नागरिकांनाही ठार केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

इसिससंदर्भात ही माहिती देणारे "घटक‘ सरकार व सर्वसामान्य नागरिकांमधील असून सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची माहिती उघड करता येत नसल्याचे राष्ट्रसंघाने म्हटले आहे. इसिसशी युद्धमान असलेले इराकचे सैन्य मोसूलजवळ पोहोचले आहे. याच वेळी जिहादी दहशतवाद्यांकडून या हत्या करण्यात आल्याची माहिती राष्ट्रसंघाच्या मानवाधिकारासंदर्भातील कार्यालयाचे प्रवक्ते रुपर्ट कोलव्हिल यांनी दिली. 

मोसूल हे इसिसच्या ताब्यात असलेलेल इराकमधील सर्वांत अखेरचे महत्त्वाचे ठिकाण आहे. मोसूलपासून 45 किमी अंतरावर असलेल्या सफिना नावाच्या गावामध्येही इसिसने 15 नागरिकांना ठार केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. ठार करण्यात आलेल्या नागरिकांचे मृतदेह इसिसकडून नदीमध्ये फेकण्यात आले.