लास वेगास येथे हल्लेखोराचा गोळीबार; दोन मृत्युमुखी

वृत्तसंस्था
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

गोळीबार सुरु झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. संशयित हल्लेखोरास ठार करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र हल्लेखोरांची संख्या किमान दोन इतकी असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे

लॉस एंजेलिस - अमेरिकेतील लास वेगास येथील "मंडाले बे' या प्रसिद्ध हॉटेलमध्ये एक संगीत कार्यक्रम सुरु असतानाच हल्लेखोराने गोळीबार केल्याने किमान 2 ठार; तर 24 जखमी झाले.

गोळीबार सुरु होताच येथे उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांनी घटनास्थळावरुन पलायन केले. हल्लेखोराकडून अक्षरश: शेकडो गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. गोळीबार सुरु झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. संशयित हल्लेखोरास ठार करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र हल्लेखोरांची संख्या किमान दोन इतकी असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. येथे पोलिसांची कारवाई अद्यापी सुरु आहे.

जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळी लागल्याने जखमी झालेल्या या नागरिकांपैकी किमान 14 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे आढळून आले आहे.

टॅग्स