लास्ट मॅन टू वॉक द मून 

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

वॉशिंग्टन डीसी - चंद्रावर जाणारे शेवटचे अंतराळवीर जीन सर्नन(82) यांचे काल (सोमवार) निधन झाले. 'नासा'ने (नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन) देखील सर्नन यांच्या मृत्युबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. 

1972च्या मोहिमे दरम्यान चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांपैकी सर्नन हे एक होते. त्यांच्या जीवनावर 'द लास्ट मॅन ऑन द मून' हा माहितीपट देखील करण्यात आला आहे.

वयाच्या 82व्या वर्षी देखील सर्नन हे अतिशय उत्साही होते. अंतराळातील मानवी अस्तित्वाविषयी त्यांना नेहमी उत्सुकता असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी 'नासा'शी बोलताना म्हटले आहे. 

अपोलो 17 चंद्रअभियान
- हे नासाच्या अपोलो अभियान मालिकेतील शेवटचे अभियान होते. 
- 7 डिसेंबर 1972 रोजी अपोलो 17 या अभियानादरम्याने मानवाने दुसऱ्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले.
- जीन सर्नन अपोलो 17 अभियानाचे कमांडर होते.
- भारतीय प्रमाण वेळेनुसार अपोलो 17 हे यान 11 वाजून 3 मिनिटांनी अवकाशात झेपावणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे याला दोन तास उशीर झाला होता.  

व्हिडिओ सौजन्य - CNN youtube

Web Title: last man to walk on the moon - gene cernan

फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी