अफगाणिस्तान सर्वोच्च न्यायालयाजवळ बॉम्बस्फोट; 20 ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

काबूल- अफगणिस्तान सर्वोच्च न्यायालयाजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 20 जण ठार झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (मंगळवार) दिली.

काबूल- अफगणिस्तान सर्वोच्च न्यायालयाजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 20 जण ठार झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (मंगळवार) दिली.

गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नजिबुल्लाह दानिश यांनी सांगितले की, शहरामध्ये असलेल्या अफगणिस्तान सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीजवळ आज दुपारी आत्मघाती दहशतवाद्यांनी मोटारीद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणला. स्फोटात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 41 जण जखमी झाले आहेत. मृत व जखमींमध्ये महिला व मुलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 8 जणांचा मृत्यू झाला. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

न्यायालयातील कामकाज संपल्यावर कर्मचारी बसने घरी परततात. या कर्मचाऱयांनी दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला आहे. परिसरात नातेवाईकांच्या शोध घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. शिवाय,  रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, काबूलमध्येच गेल्या महिन्यात संसदेजवळ तालिबानी दहशतवाद्यांनी दोन स्फोट घडवले होते. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला होता तर ८० जण जखमी झाले होते.

ग्लोबल

कॅलिफॉर्निया: सोशल नेटवर्किंगचा बादशाह असलेला फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी पुन्हा...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017