चीनमध्ये टॉवरचे छत कोसळून 40 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

बीजिंग- जियांगजी प्रांतात आज (गुरुवार) सकाळी एका टॉवरचे छत कोसळून झालेल्या अपघातात 40 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका टॉवरचे काम सुरू आहे. आज सकाळी सातच्या सुमारास नेहमीप्रमाणे काम सुरू झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम करत होते. यावेळी टॉवरचे छत कोसळल्याने अनेकजण त्याखाली दाबले गेले. यामध्ये 40 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अद्यापही अनेकजण छताखाली अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, टॉवरचे छत कोसळल्यानंतर बचाव दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

Web Title: At least 40 killed in east China scaffolding collapse