थेरेसा मे यांच्या अडचणी वाढल्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

लंडन: ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा द्यावा म्हणून त्यांच्याच पक्षातील काही खासदारांनी दबाव वाढविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे मे यांच्या अडचणींत वाढ झाल्याचे मानले जाते.

मे यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कायम राहण्यास सत्ताधारी पक्षाच्या सुमारे 30 संसद सदस्यांचा विरोध असल्याचा दावा करण्यात येत आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष ग्रांट शाप्स यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, मे यांनी पंतप्रधानपद सोडावे, असे पक्षातील काही संसद सदस्यांचे मत आहे. मे यांनी राजीनामा द्यावा, असे सांगण्याचा आम्हाला हक्क आहे.

अशा प्रकारे मे यांना पद सोडण्यास सांगणे चुकीचे असल्याचे पक्षाचे नेते डॅमिअन ग्रीन यांनी म्हटले आहे. पद सोडण्याच्या मागणीमुळे मे यांच्या मार्गातील अडचणी वाढल्या आहेत. मुदतपूर्व निवडणुका घेण्याच्या मे यांच्या निर्णयावर त्यांच्या पक्षाच्या काही सदस्यांकडून टीका केली जात आहे. ब्रिटनमधील परिस्थिती पाहता आपल्या पक्षाचे नुकसान होऊ शकते, अशा शक्‍यतेच्या पार्श्‍वभूमीवर मे यांनी मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता.