चीनचे विशेष राजदूत उत्तर कोरियात

वृत्तसंस्था
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

'दोन्ही देशांच्या नागरीकांना फायदा व्हावा यासाठी दोन्ही पक्ष व दोन देशांमधील संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.'

बीजिंग/सेऊल : उत्तर कोरियासोबत भविष्यातही सहकार्य कायम राहणार असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. उत्तर कोरियाच्या कथित अण्वस्त्रांवरून आंतरराष्ट्रीय संघर्ष चिघळण्याची शक्यता असताना चीनच्या वरीष्ठ राजनैतिक अधिकाऱयांनी उत्तर कोरियाला भेट दिली. 

चीनचे विशेष राजदूत व उत्तर कोरियाचे उच्चपदस्थ अधिकारी यांची भेट झाली. या भेटीदरम्यान उत्तर कोरियाच्या शस्त्रसंकटाचा उल्लेख झाला नाही. चीन हा उत्तर कोरियाच्या आण्विक शस्त्रे आणि क्षेपणास्त्रांचा विकास करण्याबाबत दखल घेत आहे. पण, अलीकडच्या काळात उत्तर कोरियासेबत शस्त्रास्त्रांचा विनिमय मर्यादित झालेला दिसतो.

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख साँग ताओ यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या निकालासंबंधी चर्चा करण्यासाठी प्योंगयांगला भेट दिली. चीनी प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांच्यावतीने साँग ताओ हे उत्तर कोरियाचे उच्चपदस्थ अधिकारी च्यो राँग हे यांना भेटले. साँग ताओ व च्यो राँग हे यांनी आणि दोन्ही देशांमधील संबंधांबद्दलही चर्चा केली.

'दोन्ही देशांच्या नागरीकांना फायदा व्हावा यासाठी दोन्ही पक्ष व उभय देशांमधील संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.' असेही चीनच्या आंतरराष्ट्रीय विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Marathi news China North Korea relations