'ब्रेक्‍झिट'विषयीची भूमिका स्पष्ट करा

यूएनआय
बुधवार, 14 जून 2017

स्ट्रॉसबर्ग - युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याच्या 'ब्रेक्‍झिट'च्या वाटाघाटींबाबतची आधीची भूमिका कायम ठेवणार की बदलणार, याविषयी ब्रिटनकडे युरोपीय समुदायाने स्पष्टीकरण मागितले आहे.

स्ट्रॉसबर्ग - युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याच्या 'ब्रेक्‍झिट'च्या वाटाघाटींबाबतची आधीची भूमिका कायम ठेवणार की बदलणार, याविषयी ब्रिटनकडे युरोपीय समुदायाने स्पष्टीकरण मागितले आहे.

गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लागलेल्या निकालामुळे ब्रेक्‍झिटच्या वाटाघाटींबाबत ब्रिटनच्या भूमिकेबाबत संदिग्धता निर्माण झाली. या पार्श्‍वभूमीवर युरोपीय संसदेने ब्रेक्‍झिटसाठी नेमलेले विशेष दूत गाय वेरोफास्टॅड म्हणाले की, ब्रिटनच्या भूमिकेची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. याआधी ब्रिटनने 29 मार्च रोजी जाहीर केलेल्या पत्रानुसार वाटाघाटी कायम राहणार की त्यात बदल होणार आहेत, याबाबत स्पष्टता येण्याची गरज आहे. कारण, ब्रिटनमधील निवडणुकीमुळे परिस्थितीत फरक पडला आहे. त्यामुळे ब्रिटनने युरोपीय समुदायाला ब्रेक्‍झिटच्या वाटाघाटींबाबत स्पष्ट भूमिका कळवावी.'' गाय वेरोफास्टॅड हे बेल्जियमचे माजी अध्यक्ष असून, ब्रेक्‍झिट प्रक्रियेसाठी युरोपीय संसदेने त्यांनी विशेष दूत म्हणून नियुक्ती केली आहे.