सिंगापूरमध्ये ज्वेलरला लुटल्याप्रकरणी भारतीयाला 3 वर्षे तुरुंगवास

jail
jail

सिंगापूर : येलचूर श्रीनिवास या 51 वर्षीय ज्वेलरला लुटल्याप्रकरणी 53 वर्षीय भारतीयाला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना गेल्या वर्षी 25 मे रोजी घडली. त्याच्याकडून 36,175 डॉलरचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

श्रीनिवास हे गेल्या वर्षी 25 मे रोजी आपले दैनंदिन काम आटोपून घरी जात होते. त्यावेळी श्रीनाथ बरी, रामदेव बरी आणि त्यांच्या दोन साथीदारांनी श्रीनिवास यांना लाकडी बांबूंनी मारहाण करत त्यांच्याकडील रोकड आणि काही ऐवज असा तब्बल 43 हजार सिंगापूर डॉलर किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी श्रीनाथ बरी याला अटक केली होती. त्याच्याकडून 36,175 डॉलरचा मुद्देमाल परत मिळवला होता. त्यानंतर त्याची ड्रग तपासणी करण्यासाठी युरिन चाचणीही केली गेली होती. त्यानंतर त्याला याप्रकरणात दोषी ठरवण्यात आले. ड्रगप्रकरणात दोषी आढळल्याने या सर्व आरोपींना प्रत्येकी सहा महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com