जगासमोर दहशतवादाचे मोठे आव्हान : पंतप्रधान मोदी

पीटीआय
शनिवार, 8 जुलै 2017

हॅम्बर्ग : पाकिस्तानस्थित लष्करे तैयबा आणि जैशे महंमद या दहशतवादी संघटनांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 परिषदेत आज पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. दहशतवाद हे जगासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगत मोदी यांनी दहशतवादाविरोधातील अजेंडाही या परिषदेमध्ये मांडला. 

हॅम्बर्ग : पाकिस्तानस्थित लष्करे तैयबा आणि जैशे महंमद या दहशतवादी संघटनांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 परिषदेत आज पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. दहशतवाद हे जगासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगत मोदी यांनी दहशतवादाविरोधातील अजेंडाही या परिषदेमध्ये मांडला. 

राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काही देश दहशतवादाचा उपयोग करत असल्याने अशा देशांविरोधात जी-20 गटाने एकत्रितपणे ठोस कारवाई करणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी परिषदेत बोलताना केले. "इसिस आणि अल कायदा यांच्याप्रमाणेच लष्करे तैयबा आणि जैशे महंमद या संघटना आहेत. नावांमध्ये बदल असला तरी विचारसरणी सारखीच आहे. दहशतवाद हे जगासमोरील मोठे आव्हान आहे. तरीही, या दहशतवादाकडे जागतिक समुदाय फारशा गांभीर्याने पाहत नाही. सर्वांकडून अजून सहकार्याची अपेक्षा आहे,' असे मोदी म्हणाले. या वेळी अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन, चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग हे प्रमुख जागतिक नेते उपस्थित होते. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी मोदी यांनी 11 कलमी अजेंडा परिषदेत मांडला. 

मोदींच्या अजेंड्यातील ठळक मुद्दे 

  • दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या देशांविरोधात ठोस कारवाई, या देशांच्या प्रमुखांना जी-20 देशांमध्ये प्रवेश करण्यास बंदी असावी 
  • संशयित दहशतवाद्यांची यादी सर्व जी-20 देशांनी एकमेकांना द्यावी 
  • दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुलभ करावी 
  • आंतरराष्ट्रीय दहशतवादाबाबत धोरण स्पष्ट करावे 
  • मूलतत्त्ववादाविरोधात एकत्रित लढाई 
  • दहशतवादाला निधी पुरविणाऱ्यांवर बंदी आणावी
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार धर्तीवर यंत्रणा उभारावी 
  • सायबर सुरक्षेबाबत सहकार्य वाढवावे 
  • दहशतवाद्यांचा शस्त्रपुरवठा रोखण्यासाठी यंत्रणा उभारावी 
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावांची अंमलबजावणी करावी