अफगाणिस्तानात आत्मघातकी स्फोटात चार जण ठार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पश्‍चिम फराह प्रांतातील पोलिस ठाण्यावर तालिबानने केलेल्या हल्ल्यात पाच पोलिस ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. फराह प्रांताच्या पोलिस प्रवक्‍त्याने सांगितले की, बाला ब्लूक जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जण जखमी झाले.

काबूल : राजधानी काबूलमध्ये एका शिया मशिदीच्या बाहेर झालेल्या आत्मघातकी बॉंबस्फोटात किमान चार जण ठार झाले, तर 20 जण जखमी झाले, असे अफगाण रुग्णालयाच्या सूत्रांनी आज सांगितले.

रुग्णालयाच्या कार्यक्रम समन्वयकाने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. हल्लेखोराने हुसैनी मशिदीबाहेर एक हजार मीटरवर स्वत:ला उडवून दिले. शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर हा हल्ला करण्यात आला.

हल्लेखोर हे मेंढपाळांच्या वेशात आले होते. या हल्ल्याची कोणीही जबाबदारी घेतलेली नाही. मुस्लिमांच्या अशराच्या दोन दिवस आधी हा स्फोट घडवून आणण्यात आला.