सौदी अरेबियात महिलांना आता स्टेडियममध्येही प्रवेश मिळणार! 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

रियाध : सौदी अरेबियामध्ये महिलांवर असलेले कडक निर्बंध शिथिल करण्याच्या दिशेने प्रशासनाने आणखी एक पाऊल उचलले आहे. पुढील वर्षापासून सौदीमध्ये क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी महिलांनाही स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सौदी अरेबियामध्ये महिलांना वाहन चालविण्याची परवानगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. पुढील वर्षी जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. सौदी अरेबियाचे नवे युवराज महंमद बिन सलमान यांनी देशात सामाजिक बदल करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. 

'रियाध, जेद्दाह आणि दम्मान येथील स्टेडियममध्ये आता संपूर्ण कुटुंबाला सामावून घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पुढील वर्षाच्या सुरवातीपासून ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल', असे सौदी अरेबियामधील क्रीडा विभागाने जाहीर केले. आता स्टेडियममध्ये रेस्टॉरंट्‌स, कॅफे आणि स्क्रीन्स उभारले जाणार आहेत. गेल्या महिन्यात राष्ट्रीय दिनानिमित्त प्रथमच फुटबॉल सामन्यांसाठी महिलांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला होता. 

नजीकच्या भविष्यात सौदी अरेबियामध्ये चित्रपटांवरील बंदीही हटविण्यात येण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच, स्त्री-पुरुषांनी एकत्र सण-उत्सव साजरे करण्यासही प्रोत्साहन दिले जाऊ शकते. महंमद बिन सलमान यांच्या 'मॉडरेट सौदी अरेबिया' या महत्त्वाकांक्षी मोहिमेला देशातील कट्टरवाद्यांकडून विरोध होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.