कॅटालोनियावर स्पेनचा ताबा

पीटीआय
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

माद्रिद : स्वतंत्र कॅटालोनियावर स्पेन सरकारने आज थेट ताबा मिळवला असून, स्थानिक सरकार बडतर्फे केले आहे. कॅटालोनियाच्या प्रांतिक संसदेने स्पेनपासून स्वतंत्र होण्याची घोषणा केल्यानंतर स्पेन सरकारने तातडीने ही पावले उचलली असल्याचे सांगण्यात आले. 

स्थानिक सरकार बडतर्फे करून स्पेनने कॅटालोनियावर थेट नियंत्रण प्रस्थापित केले आहे. कॅटालोनिया प्रांताच्या पोलिस दलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला स्पेन सरकारने निलंबित केले आहे. 21 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या सार्वमताच्या अधारे कॅटालोनियाच्या प्रांतिक संसदेने स्पेनपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे संपूर्ण युरोपात खळबळ उडाली आहे. 

स्वातंत्र्याची घोषणा झाल्यानंतर स्पेन सरकारने तातडीने कॅटालोनियाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व मंत्र्यांची कालच हाकालपट्टी केली होती. तसेच प्रांतिक संसद ही बरखास्त केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी स्पेनने पोलिसप्रमुखांना निलंबित करत कॅटालोनियाचा थेट ताबा घेतला आहे.

स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आल्यानंतर कॅटालोनियातील अनेक शहरांमध्ये हजारो नागरिकांनी रस्त्यांवर उतरत आनंद साजरा केला होता; मात्र ही स्वातंत्र्याची घोषण बेकायदा असल्याचे स्पेनच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार कॅटालोनियाला नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.