न्यूयॉर्कमधील 'टाईम्स स्क्वेअर'मध्ये स्फोट; दहशतवादी हल्ल्याची दाट शक्‍यता 

न्यूयॉर्कमधील 'टाईम्स स्क्वेअर'मध्ये स्फोट; दहशतवादी हल्ल्याची दाट शक्‍यता 

न्यूयॉर्क : कट्टर दहशतवादी संघटना 'इसिस'शी संबंध असलेल्या दहशतवाद्याने आज (सोमवार) न्यूयॉर्कमधील वर्दळीच्या 'टाईम्स स्क्वेअर'नजीक बॉम्बस्फोट घडवून आणला. स्थानिक प्रमाणवेळेनुसार, सोमवारी सकाळी पोर्ट ऍथॉरिटी सब-वे स्थानकाजवळ हा स्फोट झाला. पोलिसांनी या हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांकडून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर 27 वर्षे वयाचा बांगलादेशी वंशाचा तरुण आहे. त्याच्या शरीराभोवती वायर्स गुंडाळल्या होत्या आणि पाच इंचाच्या लोखंडी पाईमध्ये बॉम्ब होता. या बॉम्बचा डिटोनेटर त्याच्या जॅकेटच्या उजव्या खिशात होता. सब-वे स्थानकामध्ये जाण्याआधीच त्याच्याकडून हा डिटोनेटर दाबला गेला. 

हा हल्लेखोर गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. तो येथील एका इलेक्‍ट्रिकल कंपनीमध्ये कामास आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याने हा बॉम्ब घरीच तयार केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. 

'हा हल्लेखोर 'इसिस'च्या वतीने हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे हा दहशतवादी हल्लाच आहे', असे मत न्यूयॉर्क पोलिस दलाचे माजी संचालक बिल ब्रॅटन यांनी म्हटल्याचे वृत्त 'न्यूयॉर्क टाईम्स'ने दिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com