झुकेरबर्गने मुलीचे नाव ठेवले ऑगस्ट

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

फेसबुकचे जगभरात 2 अब्जांहून अधिक युजर्स आहेत. झुकरबर्गने ऑगस्टच्या जन्मानंतर तिला एक 'ओपन लेटर' लिहिले आहे. मार्क आणि प्रिन्सिला या दांपत्याला पहिली मुलगी आहे. मार्कने पहिली मुलगी मॅक्सिमा, पत्नी व ऑगस्टसोबतचा फोटो शेअर केला आहे. झुकरबर्ग आता ऑगस्टासाठी दोन महिन्यांची पॅटर्निटी लिव्ह घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सॅन फ्रान्सिस्को : फेसबुकचा संस्थापक व सीईओ मार्क झुकेरबर्ग दुसऱ्यांदा पिता बनला असून, त्याच्या पत्नीने मुलीला जन्म दिला आहे. झुकेरबर्गने फेसबुकवर पोस्ट लिहून मुलीच्या जन्माबाबत माहिती दिली आणि तिचे नाव ऑगस्ट असे ठेवले आहे.

फेसबुकचे जगभरात 2 अब्जांहून अधिक युजर्स आहेत. झुकरबर्गने ऑगस्टच्या जन्मानंतर तिला एक 'ओपन लेटर' लिहिले आहे. मार्क आणि प्रिन्सिला या दांपत्याला पहिली मुलगी आहे. मार्कने पहिली मुलगी मॅक्सिमा, पत्नी व ऑगस्टसोबतचा फोटो शेअर केला आहे. झुकरबर्ग आता ऑगस्टासाठी दोन महिन्यांची पॅटर्निटी लिव्ह घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

झुकेरबर्गने मुलीला लिहिलेल्या पत्रात आपला आनंद व्यक्त केला आहे. तू खूप लवकर मोठी होऊ नकोस असेही तो म्हणतोय. त्याने जगात तिचे स्वागतही केले आहे. पण त्यातही जगाच्या वास्तवाची कल्पनाही दिली आहे. बालपण जादुई असते आणि ते एकदाच मिळते त्यामुळे ते पूर्णपणे जगून घे. झुकरबर्ग दांपत्य संगोपनासाठी प्रचंड उत्सुक आणि आनंदी आहे. मला आशा आहे, की तु आणि तुझी बहिण अशा जगात मोठ्या व्हाल, तेथे उच्च शिक्षण, कमी रोगराई, एकत्र नांदत असलेले समुदाय असतील. मॅक्सिमाच्या जन्मावेळी ही लिहिलेल्या पत्रात मी तंत्रज्ञान आणि विज्ञानच्या जगात वाढ होणार असे म्हटले होते.