मार्क झुकेरबर्गने दान केले 9.5 कोटी डॉलर्स

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

'क्रॉनिकल ऑफ फिलानथ्रॉपी' या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील वार्षिक 50 दानशूरांच्या यादीत झुकेरबर्ग दांपत्याचा समावेश झाला आले. 'फोर्ब्स' मासिकाने दिलेल्या अंदाजानुसार, झुकेरबर्ग हे जगातील चौथे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.

सॅन फ्रान्सिस्को : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी 9.5 कोटी डॉलरची संपत्ती दान केली आहे. 

अमेरिकी बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, झुकेरबर्ग यांनी 17 ते 18 नोव्हेंबर दरम्यान फेसबुकच्या 9.5 कोटी डॉलर मूल्याच्या शेअर्सची विक्री केली आहे. झुकेरबर्ग यांची 52 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. झुकेरबर्ग यांच्या मालमत्तेत गेल्या काही वर्षांमुळे वाढ होत गेली आहे. त्याचप्रमाणे फेसबुकच्या शेअर्सच्या विक्रीमुळे फेसबुकच्या शेअरमध्ये तरलता वाढल्यामुळे शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. असा दुहेरी फायदा झुकेरबर्ग यांना झाला आहे. 

झुकेरबर्ग दांपत्याने गेल्यावर्षी देखील 1 कोटी 80 लाख डॉलर्स एवढी रक्कम दान केली होती. एवढी मोठी रक्कम देणारे झुकेरबर्ग हे अमेरिकेतील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. 'क्रॉनिकल ऑफ फिलानथ्रॉपी' या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील वार्षिक 50 दानशूरांच्या यादीत झुकेरबर्ग दांपत्याचा समावेश झाला आले. 'फोर्ब्स' मासिकाने दिलेल्या अंदाजानुसार, झुकेरबर्ग हे जगातील चौथे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.

टॅग्स