शीख समुदायाच्या प्रमुखाची अफगाणिस्तानात हत्या

पीटीआय
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

काबूल - अफगाणिस्तानातील शीख समुदायाच्या प्रमुखाची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. गेल्या तीन महिन्यांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. लाला देल सेओझ असे मृताचे नाव असून, हाजी गुलिस्तान कोची हमान भागात ही घटना घडल्याचे टोलो वाहिनीकडून सांगण्यात आले.

लाला यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर पाच वर्षांपूर्वीही असाच प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. मात्र त्या हल्ल्यातून ते बचावले होते. विशेष म्हणजे लाला यांचा स्वभाव प्रेमळ होता. त्यांचे कोणासोबत वैर नव्हते, अशी माहिती लाला यांचे चुलत भाऊ प्रेम यांनी दिली.

अफगाणिस्तानात हिंदू व शीख धोक्‍यात
गेल्या तीन दशकांमध्ये 99 टक्के हिंदू आणि शीख कुटुंबांनी अफगाणिस्तान सोडले आहे. 1980 मध्ये अफगाणिस्तानात 2 लाख 20 हजार हिंदू व शिखांची लोकसंख्या होती. तर सध्या या युद्धजन्य देशामध्ये केवळ 1 हजार 350 हिंदू व शीख वास्तव्यास असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये हिंदू व शीख कुटुंबीयांना लक्ष्य केले आहे. विशेषत: अफगाणिस्तानच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक कुटुंबे काबूलमध्ये स्थलांतरित झाली आहेत.

ग्लोबल

कॅलिफॉर्निया: सोशल नेटवर्किंगचा बादशाह असलेला फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी पुन्हा...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017