म्यानमारमध्ये 30,000 रोहिंग्या मुस्लिम विस्थापित

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

रंगून- वायव्य म्यानमारमधील रोहिंग्या जमातींच्या वसाहती असलेल्या खेड्यांतील एक हजारपेक्षा जास्त घरे उध्वस्त करण्यात आली आहेत. उपग्रहांवरून मिळालेल्या छायाचित्रांवरून मानवाधिकार निरीक्षण संस्थेने याबाबत विश्लेषण केले आहे. 

रंगून- वायव्य म्यानमारमधील रोहिंग्या जमातींच्या वसाहती असलेल्या खेड्यांतील एक हजारपेक्षा जास्त घरे उध्वस्त करण्यात आली आहेत. उपग्रहांवरून मिळालेल्या छायाचित्रांवरून मानवाधिकार निरीक्षण संस्थेने याबाबत विश्लेषण केले आहे. 

बांगलादेशच्या सीमेलगतच्या भूप्रदेशावर मोठ्या संख्येने फौजा उतरल्या आहेत. या भागात बहुतांश मुस्लिम रोहिंग्या या निर्वासित अल्पसंख्यांक जमातीचे लोक राहतात. या जमातीला म्यानमारने स्वीकारलेले नाही. रोहिंग्या हे मुस्लिम भारतीय-आर्य लोक असून ते म्यानमारच्या रखिने या राज्यात राहतात. ते मूळचे रखिने येथीलच असल्याचा त्यांचा दावा असून, काही तज्ज्ञांचेही तसे मत आहे. काही इतिहासकारांचे मत त्याबाबत वेगळे आहे. त्यांच्या मते रोहिंग्या लोक बंगालमधून म्यानमारमध्ये स्थलांतरित झाले आहेत. प्रथम ब्रिटिशांचे बर्मावर राज्य असताना, आणि नंतर काही प्रमाणात 1948 मध्ये म्यानमारच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात हे लोक स्थलांतरित झाले. तसेच, बांगलादेशच्या 1971 च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळातही रोहिंग्या लोक म्यानमारमध्ये स्थलांतरित झाले असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.

रोहिंग्यांकडून मागील महिन्यात सीमेलगत असलेल्या पोलिसांच्या चौक्यांवर नियोजनपूर्वक हल्ले करण्यात आल्यावर येथे म्यानमारकडून मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामुळे उसळलेल्या हिंसचारात सुमारे 30 हजार लोक विस्थापित झाले असल्याची माहिती राष्ट्रसंघाने दिली आहे. 

Web Title: Myanmar:1,000 houses razed and 30,000 people displaced in anti-Rohingya violence