न्यूयॉर्कमधील गोळीबारात हल्लेखोरासह दोघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

न्यूयॉर्क: लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या न्यूयॉर्कमधील एका रुग्णालयातील डॉक्‍टरने आपल्याच एका सहकारी महिला डॉक्‍टरचा गोळी घालून खून केला असून, इतर सहा जणांना जखमी केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयात गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर डॉक्‍टरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले.

न्यूयॉर्कमधील एका रुग्णालयात काम करणाऱ्या हेन्री बेलो (वय 45) या डॉक्‍टरवर लैंगिक छळ केल्याचा आरोप रुग्णालयात काम करणाऱ्या 23 वर्षीय महिलेने केला होता. त्यानंतर कारवाई झाल्यामुळे हेन्री याला नोकरी सोडावी लागली होती. शुक्रवारी हेन्री याने रुग्णालयात येऊन गोळीबार केला. एका महिला डॉक्‍टरचा हेन्री याने गोळी घालून खून केला. यावेळी त्याने केलेल्या गोळीबारात सह जण गंभीर जखमी झाले असून, त्यात काही डॉक्‍टरांचा समावेश आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. हेन्री याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.