कधीकाळी हाफीज तुमचा "डार्लिंग' होता

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पाकचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांचा अमेरिकेस टोला

न्यूयॉर्क : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद्यांचा सूत्रधार हाफीज सईद हे आमचे उत्तरदायित्व असल्याचे मान्य करत दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आणखी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट केले. दहशतवादाचे संकट मान्य करताना त्यांनी अमेरिकेलाही खडे बोल सुनावले. काही वर्षांपूर्वी हीच माणसे अमेरिकेसाठी "डार्लिंग' होती, असेही त्यांनी नमूद केले.

येथील "एशिया सोसायटी'च्या वतीने आयोजित चर्चासत्रामध्ये त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ते म्हणाले, ""पाकिस्तान हक्कानी नेटवर्क, हाफीज सईद आणि लष्करे तैयबाला पाठिंबा देत आहे असे बोलणे सोपे आहे, ते आमचे उत्तरदायित्व असल्याचे आम्ही मान्य केले आहे; पण हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आम्हाला आणखी थोडा वेळ देणे गरजेचे आहे. आजमितीस त्यांचा सामना करण्याएवढी साधनसामग्री आमच्याजवळ नसताना तुम्ही मात्र दबाव वाढवत आहात.''

व्हाइट हाउसचा पाहुणचार
हाफीज सईद आणि हक्कानी नेटवर्कसाठी आमच्यावर आरोप करू नका, 20 ते 30 वर्षांपूर्वी हीच मंडळी तुमच्यासाठी डार्लिंग होती. या मंडळींचा पाहुणचार व्हाइट हाउसनेच केला होता. आता तुम्हीच पाकिस्तानला नरकामध्ये जायला सांगत आहात. कधीकाळी याच मंडळींना तुम्ही पोसले होते, असेही आसिफ यांनी नमूद केले. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याने अमेरिकेच्या नाकाला मात्र मिरच्या झोंबल्या आहेत.

Web Title: new york news terrorst hafiz saeed and usa