पाक नागरिकांना अमेरिका प्रवेशाची बंदी नाही

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पाकिस्तानसहच लेबनॉन व अफगाणिस्तान हे देश या देशांमधून अमेरिकेमध्ये येणाऱ्या नागरिकांची आवश्‍यक ती सर्व माहिती पुरवित असल्याचे व्हाईट हाऊसमध्ये माध्यम सचिव सीन स्पायसर यांनी म्हटले आहे

वॉशिंग्टन - पाकिस्तानी नागरिकांवर अमेरिका प्रवेशासंदर्भात बंदी लादण्याचा कोणताही विचार नसल्याचे अमेरिकेने म्हटल्याचे वृत्त पाकमधील प्रभावशाली वृत्तपत्र असलेल्या "डॉन'ने दिले आहे.

अमेरिकेमध्ये येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची आवश्‍यक ती सर्व माहिती पाकिस्तानकडून पुरविली जात असल्याने त्यांच्यासाठी "व्हिसाबंदी' स्वरुपाचा कोणताही प्रस्ताव सध्या नसल्याचे एका उच्चस्तरीय अमेरिकन अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. याचबरोबर, अमेरिका प्रवेशासंदर्भात बंदी घालण्यात आलेल्या देशांची संख्या आणखी वाढविण्याचीही योजना नसल्याचे स्पष्ट संकेत व्हाईट हाऊसकडून देण्यात आले आहेत. पाकिस्तानसहच लेबनॉन व अफगाणिस्तान हे देश या देशांमधून अमेरिकेमध्ये येणाऱ्या नागरिकांची आवश्‍यक ती सर्व माहिती पुरवित असल्याचे व्हाईट हाऊसमध्ये माध्यम सचिव सीन स्पायसर यांनी म्हटले आहे. अर्थात या सहकार्यात खंड पडल्यास या वा अन्य देशांचा अंतर्भाव व्हिसाबंदीच्या यादीमध्ये केला जाईल, असा स्पष्ट इशाराही स्पायसर यांनी यावेळी दिला.

अमेरिकेच्या आशियासंदर्भातील परराष्ट्र धोरणामधील पाकिस्तानच्या संवेदनशील स्थानाच्या पार्श्‍वभूमीवर व्हिसाबंदीचे नवे धोरण सध्या पाकिस्तानसाठी लागू न करण्याचा अमेरिकेचा निर्णय अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

ग्लोबल

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

बार्सिलोना - स्पेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बार्सिलोना येथे गर्दीमध्ये...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017