उत्तर कोरियाकडे तेव्हा असतील 45 आण्विक अस्त्रे

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

सोल- उत्तर कोरिया 2020 पर्यंत स्वतःच्या मालकीची 45 आण्विक शस्त्रे बनवू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 
उत्तर कोरियाकडील प्लुटोनियम आणि समृद्ध युरेनियमच्या साठ्यात होणारी अंदाजित वाढ, तसेच शस्त्रास्त्र विकासाचा त्यांचा वाढता वेग लक्षात घेता त्यांच्याकडील आण्विक शस्त्रांमध्ये एवढी वाढ होऊ शकते, असे दक्षिण कोरियन तज्ज्ञांचे मत आहे. 

प्योंगयाँगमध्ये सध्या सुमारे 280 किलोग्रॅम एवढे उच्च प्रतीचे युरेनियम असावे असा अंदाज आहे, असे सेजाँग इंस्टिट्यूटच्या संशोधन नियोजन विभागाचे उपाध्यक्ष ली साँग-ह्यून यांनी सांगितले. सेजाँग इंस्टिट्यूट ही दक्षिण कोरियातील सर्वांत प्रभावी 'थिंक टँक'पैकी एक आहे. 

"उत्तर कोरियाच्या ताब्यात असलेल्या आण्विक साहित्याचे प्रमाण लक्षात घेता त्या देशाकडे 22 ते 45 आण्विक शस्त्रे असू शकतात," असे त्यांनी पुढील तीन वर्षांचे भाकित करताना म्हटले आहे. 
तसेच, अंदाजे 50 किलोग्रॅम एवढ्या प्लुटोनियमचा साठा उत्तर कोरियाकडे आहे. त्यामुळे अणूबाँब तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेडिओलहरींनी युक्त मुलद्रव्यांवर पुनर्प्रक्रिया करण्याची क्षमता येत्या काळात वाढेल, असे ली यांनी म्हटले आहे.