उत्तर कोरियाने केली पाचवी अणुचाचणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016

सेऊल : उत्तर कोरियाने पाचव्यांदा अणुचाचणी केल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या लष्कराने आज (शुक्रवार) केला. उत्तर कोरियाने चाचणी केलेल्या ठिकाणाजवळ 5.3 रिश्‍टर स्केलचा ‘कृत्रिम‘ भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. यापूर्वी केलेल्या चाचण्यांमुळे संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय समूहानेही उत्तर कोरियावर निर्बंध घातले आहेत.

जपान आणि दक्षिण कोरियातील लष्करी तज्ज्ञ या हालचालींवर नजर ठेवून आहेत. यापूर्वी 6 जानेवारी रोजीही उत्तर कोरियाने अशाच प्रकारे अचानक अणुचाचणी केली होती. त्यावेळीही कृत्रिम भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली होती. 

2006 मध्ये उत्तर कोरियाने त्यांची पहिली अणुचाचणी केली होती. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रांनी एकूण पाच वेळा त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. चीनमध्ये ‘जी-20‘च्या बैठकीसाठी जागतिक पातळीवरील नेते एकत्र आलेले असतानाच उत्तर कोरियाने गेल्या सोमवारीही तीन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. उत्तर कोरियाच्या या आक्रमक भूमिकेमुळे दक्षिण कोरियाबरोबरील संबंधांतील तणावात भरच पडणार आहे. अमेरिकेबरोबर असलेले लष्करी संबंध वाढविण्याची तयारी दक्षिण कोरिया करत असल्याचेही वृत्त आहे. विशेष म्हणजे, उत्तर कोरियाचा खंदा समर्थक असलेल्या चीननेही ‘अधिकृतरित्या‘ या अणुचाचण्यांचा निषेध केला आहे. ‘आंतरराष्ट्रीय समूहाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून उत्तर कोरियाने केलेल्या या अणुचाचण्यांना चीनच्या सरकारचा ठाम विरोध आहे,‘ अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली.

ग्लोबल

कैरो - इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेकडून एका असहाय्य मातेस...

01.57 PM

लंडनः इंग्रजी शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी शब्दकोशांची मदत होते. सध्या बाजारात विविध शब्दकोश उपलब्ध असले तरी "ऑक्‍सफर्ड इंग्रजी...

01.00 AM

चीनचा आडमुठेपणा; भारताला चुका सुधारण्याचा सल्ला बीजिंग: चीनने सिक्कीम सेक्‍टरमधील रस्तेनिर्मिती योग्यच असल्याचा दावा करताना,...

बुधवार, 28 जून 2017