अमेरिकेने आगळिक केल्यास निर्दयपणे प्रत्युत्तर 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

सोल : अमेरिकेने कोणत्याही प्रकारे आगळिक केल्यास त्याला निर्दयपणे प्रत्युत्तर देण्याचा इशारा उत्तर कोरियाच्या लष्कराने दिला आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून आणि हा देश नव्याने शस्त्र चाचण्या घेणार असल्याच्या संभाव्य वृत्ताने सध्या तणाव निर्माण झाला आहे. 

उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबविण्यात चीनला जर अपयश आले, तर अमेरिका एकतर्फी कारवाई करेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दिला होता. त्यानंतर अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या द्वीपावर विमान पथकही पाठविले आहे. 

त्या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरियाच्या पीपल्स आर्मीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ट्रम्प सरकार आम्हाला सरळसरळ धमकी देऊन ब्लॅकमेल करत आहे. अमेरिकेने आमच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला निर्दयतेने प्रत्युत्तर देण्यात येईल.

दक्षिण कोरियातील अमेरिकेचे लष्करी तळ, तसेच दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांच्या निवासस्थानाला लक्ष्य केले जाईल.