पाकने आतापर्यंत आमचा केवळ फायदाच घेतला: ट्रम्प

Donald Trump
Donald Trump

वॉशिंग्टन : पाकिस्तानने आतापर्यंत केवळ आमचा केवळ फायदाच घेतला असून, वास्तविक संबंधांना आत्ता कुठे सुरवात झाली असल्याची टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांकडून अमेरिकी कॅनेडियन कुटुंबाची सुटका केल्यानंतर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी शुक्रवारी ट्‌विट करून म्हटले, की पाकिस्तान आणि त्यांच्या नेत्यांनी आतापर्यंत केवळ आमचा फायदाच घेतला. आता खऱ्या अर्थाने पाकिस्तानसोबत संबंधांची सुरवात झाली आहे. त्याबद्दल मी पाकिस्तानी नेत्यांचा आभारी आहे. दहशतवादाविरोधात कठीण समयी पाकिस्तानने आमची साथ दिली. 

अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स म्हणाले, की पाकिस्तान दहशतवादाविरोधात अमेरिकेला सकारात्मक उत्तर दिले आहे. तेथील लष्कराने 5 वर्षांपासून दहशतवाद्यांच्या तावडीत असलेल्या अमेरिकन वंशाच्या कॅनेडियन कुटुंबाची सुटका केली आहे. 

कॅटलन आणि जोशुआ यांचे 2012 मध्ये अफगाणिस्तानातून अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांच्या तावडीत असतानाच त्यांना 3 मुले झाली. अमेरिकन गुप्तचर विभागाच्या मदतीने पाकिस्तानच्या लष्कराने त्या सर्व 5 जणांची सुखरूप सुटका केली. ट्रम्प यांनी दहशतवादी संघटना आणि हल्ल्यांवरून पाकिस्तानवर वेळोवेळी टीका केली. ऑगस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला दहशतवादविषयक धोरण न बदलल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com