चुकीच्या पुराव्यामुळे पाक तोंडघशी 

वृत्तसंस्था
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

भारताचे आरोप पाकने फेटाळले
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानवर केलेले सर्व आरोप पाकिस्तानने आज फेटाळून लावले. राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी भारताचे आरोप नाकारताना, भारताकडूनच वारंवार शस्त्रसंधीचा भंग होत असल्याचा दावा केला. जागतिक समुदायाने भारताकडून होणारा गोळीबार रोखावा, असे आवाहनही लोधी यांनी केले. 

न्यूयॉर्क : भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या आरोपांना उत्तर देताना पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलिहा लोधी अपेक्षेप्रमाणे काश्‍मीरच्या मुद्‌द्‌याकडे वळाल्या. काश्‍मीरमध्ये भारत नागरिकांवर अत्याचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. पुरावा म्हणून त्यांनी एका महिलेचे छायाचित्र आमसभेत दाखविले. भारतीय जवानांच्या पॅलेट गनच्या माऱ्यात जखमी झालेल्या महिलेचे हे छायाचित्र असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, संबंधित महिलेचे नाव राव्या अबू जोम असून ती काश्‍मीरमधील नव्हे, इस्राईलजवळील गाझापट्टीतील असल्याचे उघड झाल्याने पाकिस्तान जगासमोर तोंडघशी पडला.

काश्‍मीरबाबत चुकीची माहिती देऊन राष्ट्रसंघाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही यामुळे उघड झाला. 

भारताचे आरोप पाकने फेटाळले
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानवर केलेले सर्व आरोप पाकिस्तानने आज फेटाळून लावले. राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी भारताचे आरोप नाकारताना, भारताकडूनच वारंवार शस्त्रसंधीचा भंग होत असल्याचा दावा केला. जागतिक समुदायाने भारताकडून होणारा गोळीबार रोखावा, असे आवाहनही लोधी यांनी केले. 

"पाकिस्तानचा दहशतवादी घटनांमध्ये हात असल्याचा स्वराज यांनी केलेला आरोप चुकीचा असून, भारतालाच दहशतवाद पसरविण्याचा अनुभव आहे. शेजारी देशांमध्ये दहशतवाद पसरविणारा भारत "दहशतवादाची जननी' आहे,' असा आरोप लोधी यांनी केला. स्वराज यांनी पाकिस्तानविरोधात आरोप करताना वापरलेली भाषा नैतिकतेचे उल्लंघन करणारी असल्याचेही त्या म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे भारताकडून पालन करून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक नेमावा आणि दोन देशांमधील थांबलेली चर्चा सुरू करावी, अशी मागणी लोधी यांनी केली.