13 वर्षांत पेट्रोल डिझेलच्या गाड्या पॅरिसमधून होणार हद्दपार

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

हरित वायूचे प्रमाण करण्यासाठी हे दीर्घकालीन नियोजन केले आहे. 2040 पर्यंत खनिज इंधनावर अवलंबून असणारी वाहने वापरातून काढून टाकण्याचा निर्णय फ्रान्सने यापूर्वीच घेतला आहे. यासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत

पॅरिस - जगातील सर्वांत महागडे शहर असलेले व पर्यटकांचे आवडते शहर पॅरिसची वाटचाल आता प्रदूषणमुक्तीकडे चालली आहे. पेट्रोल व डिझेलवरील मोटारी शहरातून 2030 पर्यंत हद्दपार करण्याचा निर्णय येथील प्रशासनाने घेतला आहे.

हवेतील प्रदूषण वाढत असल्याने शहरात अनेकदा पेट्रोल व डिझेलवरील वाहनांवर तात्पुरती बंदी घातली जातो; पण आता पॅरिस कायमच प्रदूषणमुक्त होण्यासाठी फ्रान्समधील "पॅरिस सिटी हॉल'ने या गाड्या हद्दपार करून इलेक्‍ट्रिक मोटारी आणण्याचा निर्णय एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला आहे.

"हरित वायूचे प्रमाण करण्यासाठी हे दीर्घकालीन नियोजन केले आहे. 2040 पर्यंत खनिज इंधनावर अवलंबून असणारी वाहने वापरातून काढून टाकण्याचा निर्णय फ्रान्सने यापूर्वीच घेतला आहे. यासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत,'' असे महापौर ऍनी हिडाल्गो यांच्या कार्यालयातील वाहतूकविषयक धोरणकर्ते ख्रिस्तोफर नाडोस्की यांनी सांगितले.