इराणच्या अध्यक्षांना विनाअट भेटण्यास तयार : ट्रम्प 

पीटीआय
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

वॉशिंग्टन (पीटीआय) : आठ दिवसांपूर्वी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांना धमकाविणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला सूर मवाळ करत रुहानी यांच्याशी विनाअट चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. इराणच्या अणू कार्यक्रमाच्या संदर्भात नवा करार करण्याची त्यांची इच्छा असेल तर रुहानी यांना विनाअट भेटण्यास मी तयार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात इराणबरोबर करण्यात आलेल्या अणू करारातून माघार घेत असल्याची घोषणा ट्रम्प यांनी मे महिन्यात केली होती. हा अतिशय वाईट करार असल्याचे ते म्हणाले होते. 

तसेच, इराणने अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असे ट्‌विट ट्रम्प यांनी मागील आठवड्यात केले होते. मात्र, इराणबाबतच्या धोरणात पुन्हा यू-टर्न करत अध्यक्ष रुहानी यांना विनाअट भेटण्यास आपण तयार आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणबरोबर नव्याने अणू करार करण्याचीही अमेरिकेची तयारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 
 
Web Title: Ready to meet President of Iran : Trump