काश्‍मीरमध्ये चकमकीत सात दहशतवादी ठार

पीटीआय
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यांत लंगेट येथील लष्कराच्या छावणीवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव जवानांनी आज हाणून पाडला. या वेळी झालेल्या चकमकीत तिन्ही दहशतवादी ठार झाले. दरम्यान, पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने घुसखोरी करण्याचे दहशतवाद्यांचे तीन प्रयत्न लष्कराने हाणून पाडले. या वेळी झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला.

लंगेट येथील लष्कराच्या छावणीवर आज पहाटे पाचच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या वेळी दक्ष असलेल्या जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या वेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. या कारवाईबाबत माहिती देताना कर्नल राजीव सारंग म्हणाले, ‘‘लष्करी तळाच्या कुंपणाजवळ संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांना हटकले. हे दहशतवादी कुंपणाच्या अगदी जवळच होते. हटकल्यानंतर त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. जवानांनी केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळ काढता आला नाही. यात तीनही दहशतवादी मारले गेले.’’

या दहशतवाद्याकंडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा व साहित्य जप्त करण्यात आले.