'जेम्स बाँड' स्टार सर रॉजर मूर यांचे निधन

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

न्यूयॉर्कः माजी 'जेम्स बॉंड' स्टार सर रॉजर मूर यांचे कर्करोगाने स्विर्त्झलंड येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी आज (मंगळवार) दिली.

मूर यांच्या कुटुंबियांनी ट्विटरवरून सर रॉजर मूर यांच्या निधनाची माहिती दिली. सर रॉजर मूर यांचे आज निधन झाले असून, आम्ही उद्धवस्त झालो आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

हॉलिवूडमध्ये जेम्स बाँड मालिकेतील सात चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. यामुळे जेम्स बाँड म्हणून त्यांची ओळख झाली होती.