मेलबर्नमध्ये विमान कोसळून 5 ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मेलबर्न - ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात खाजगी विमान शॉपिंग सेंटरला धडकल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

मेलबर्न जवळील इस्डन फिल्ड एअरपोर्ट वरुन निघालेले हे विमान थोड्याच वेळात तांत्रिक बिघाडामुळे शॉपिंग सेंटरला जाउन धडकले. विमान इमारतीला धडकल्याने भीषण स्फोट झाला. यामध्ये विमानातील पाच जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

शॉपिंग सेंटर सुरु होण्यापुर्वी काही तास अगोदर हा अपघात झाला. अपघातावेळी शॉपिंग सेंटर बंद असल्याने मोठी जिवीतहानी टळली. परंतू विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. 