पाकिस्तानला अकबरुद्दीनांकडून सडेतोड प्रत्युत्तर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

न्यूयॉर्क - हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर बुऱ्हान वणी याला भारतीय लष्कराने कारवाईमध्ये ठार केल्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

"इतरांची भूमी हडपण्याच्या उद्देशार्थ दहशतवादाचा वापर देशाचे धोरण म्हणून करणाऱ्या पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या तत्त्वांस उत्तेजन करण्यात येते,‘ अशी कठोर टीका भारताचे संयुक्त राष्ट्रसंघामधील राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी केली. 

पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी राष्ट्रसंघामध्ये बोलताना उपस्थित केलेल्या काश्‍मीरसंदर्भातील मुद्याबरोबरच "काश्‍मिरी नेता‘ असलेल्या वणीची भारताने हत्या केल्याचा आरोपही केला होता. यानंतर अकबरुद्दीन यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पाकिस्तानमधील मानवाधिकारासंदर्भातील भीषण परिस्थितीमुळे या देशास राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संस्थेचे सदस्यत्व मिळविण्यात अद्याप यश आले नसल्याचे सांगितले. पाकिस्तानकडून राष्ट्रसंघाच्या व्यासपीठाचा गैरवापर करण्यात येत असल्याचेही अकबरुद्दीन यांनी यावेळी स्पष्ट केले.