तालिबानने विद्यार्थ्याला लटकावले फासावर

वृत्तसंस्था
शनिवार, 3 डिसेंबर 2016

काबूल- तालिबान या दहशतवादी संघटनेच्या एका म्होरक्याला ठार करण्यात हात असल्याचा आरोप एका विद्यार्थ्यावर ठेवत तालिबानी अतिरेक्यांनी त्याला सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकावले. 

तालिबानच्या हेरगिरी गटाचा प्रमुख पदाधिकारी असलेला मुल्ला मिरवाईस याची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येमध्ये काबूल पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीत चौथ्या वर्षात शिकणारा फैज उल रहमान वार्दाक याचा हात आहे असा आरोप स्थानिक तालिबानी घुसखोरांनी केला होता. 

हत्या केल्याच्या आरोपावरून वार्दाक या विद्यार्थ्याला त्यांना काबूल शहराबाहेरील चाक जिल्ह्यातील सेवका गावात फासावर लटकावून मारले, अशी माहिती अधिकारी अब्दुल रहमान मंगल यांनी दिली.